Appeal by the Trust- 78th Mahotsav: oct 29, 2018

-----निवेदन----

औंध संस्थान, जिल्हा सातारा, तालुका खटाव  चे  राजगायक गायनाचार्य पंडित अनंत मनोहर जोशी आणि त्यांचे पुत्र  पंडित गजाननबुवा यांनी आपले आध्यात्मिक गुरु शिवानंद स्वामी यांच्या समाधी स्थानी त्यांच्या पहिल्या पुण्यातिथीस  दत्त मंदिराची प्रतिष्ठापना केली आणि त्यांच्या स्मरणार्थ  १९४० साली  अश्विन वद्य पंचमीस औंध संगीत महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली . प्रारंभी जोशी कुटुंबीयांनी चालवलेला हा उत्सव सन १९८१  पासून पंडित गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानद्वारे सुनियोजित  व भव्य प्रमाणावर सुरु झाला.  १९४० साली सुरु झालेला हा उत्सव या वर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

 पंडित अनंत मनोहर जोशी हे पंडित बाळकृष्णबुवा इचलकाराजीकारांचे ज्येष्ठ शिष्य होते. ग्वाल्हेर गायकीच्या महाराष्ट्रातील प्रचार आणि प्रसाराचे ते एक आधारस्तंभ होते. त्यांचे अध्यात्मिक गुरु शिवानंद स्वामी  यांना स्वर सुमनांजली वाहण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या औंध संगीत महोत्सवाने गेल्या ७४ वर्षात संगीताच्या प्रचार, प्रसार आणि शिक्षणात मोलाची. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील त्यांच्या बहुमोल कामगिरीचा गौरव त्यांना १९५५ साली सरकारने  "संगीत नाटक अकादमी पुरस्कार" देऊन केला. 

शिवानंद सामी संगीत प्रतिष्ठान ह्या संस्थेची स्थापना पंडित गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ४ जानेवारी १९८१ साली झालिग़ेलि ३४ वर्षे हे संस्था संगीत क्षेत्रात अनेक उपक्रम चालवत आहे. संगीताचा प्रचार व प्रसार करणारी संगीत शिक्षण शिबिरे, परिसंवाद,चर्चासत्रे, कार्यशाळा  आदी उपक्रम संस्थेने गेली अनेक वर्षे यशस्वीपणे आयोजीत १९८१-१९८८ पर्यंत सपन्न्न झालेले २-३ दिवसांचे संगीत समारोह, १९९० साली औंध येथे महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य रसिकांच्या उपस्थितीत व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडलेला औंध संगीत १९९१ साली भारत रत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या मैफिलीने झालेला त्याचा  सांगतासमारंभ, १९९५  सालचे आय टी  सी संमेलन, २००० साली पद्मविभूषण गंगुबाई हंगल यांच्या गायनाने  रंगलेला  हिरक महोत्सव, २०१० साली पंडित गजाननबुवांच्या जन्म शताब्दी वर्षात पद्मभूषण गिरिजादेवी यांच्या गायनाने रंगलेला उत्सव असे एक ना अनेक कार्यक्रम औंध संगीत महोत्सव हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आयोजीत केला जाणारा  आणि गेली ७४ वर्षे सातत्याने  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेस अभिजात संगीताची गोडी लावण्यात  यशस्वी ठरलेला एकमेव संगीत महोत्सव आहे. 

अश्विन वद्य पंचमीस होणाऱ्या  या उत्सवाला मुंबईच नव्हे  तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून संगीताचा अवीट स्वरानंद अनुभवतात. 

शिवानंद स्वामींच्या समाधी समोर आजपर्यंत अनेक प्रतिथयश बुजुर्ग कलाकारांनी संगीत  सेवा अर्पण करण्याच्या भावनेने आपली कला सादर केलेली आहे  तसेच संस्थेने अनेक होतकरू कालाकारांना  व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. यात स्वतः पंडित गजाननबुवा जोशी, पंडित निवृत्तीबुवा सरनाईक,पंडित बाळासाहेब पूछ्वाले , पंडित दिनकर कायकिणी ,पंडित वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, पंडित यशवंतबुवा जोशी,स्वरभास्कर  पंडित भीमसेन  जोशी, पंडित मधुकर जोशी, पंडित उल्हास कशाळकर, पंडिता  धोंडूताई कुलकर्णी, पंडिता गंगुबाई हंगल, पंडिता गिरीजा देवी,पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद शाहिद परवेझ, पंडित भाई गायतोंडे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर,पंडित योगेश समसी, पंडित विजय घाटे,रोणू मजुमदार, प्रवीण गोडखिंडी, नृत्यांगना पंडिता रोहिणी  भाटे, श्रीमती  शमा भाटे, सुचेता भिडे -चाफेकर, योगिनी गांधी  असे एक ना अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी हा रंगमंच बहरलेला औंध संगीत महोत्सवास पुणे विद्यापेठाच्या ललित कला केंद्रा (गुरुकुल) पुणे विद्यापीठ ने सातत्याने पाठींबा दिलेला आहे. दर वर्षी उत्सवात संगीतविषयक अभ्यासपूर्ण लिखाणाचा अंतर्भाव करणारी व सर्वांच्या स्मरणात राहील अशी "रियाझ" ही वार्षिक स्मरणिका प्रकाशित

  •  संस्थेच्या संकेत स्थळावर अनेक रागांचे  रेकॉर्डिंग मोफत उपलब्ध करून देणे.
  • पं अंतुबुवा व पं. गजाननबुवांच्या बंदिशी पुस्तक व सीडी रुपात विद्यार्थ्यांपर्यंत
  • अनेक दर्जेदार मैफलींचे आयोजन करून ही कला प्रवाही ठेवणे.

   

२००८  या वर्षी संस्थेने पंडित अनंत मनोहर जोशी व पंडित गजाननबुवा जोशी यांच्या रचनाचे पुस्तक "मालानिया गुंदे लावोरी " व  त्याची सीडी  या दोन्हीचे प्रकाशन केले. तसेच २०१२ साली पंडित गजाननबुवा जोशी च्या www.GajananbuwaJoshi.com या संकेत स्थळाचे उद्घाटन केले. या संकेतस्थळावर रसिकाना पंडित गाजनंबुवांच्या गायनाचे  आणि व्हायोलीन वादनाच्या कार्यक्रमांचे ध्वनी मुद्रण उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच
 शिष्यांना शिकवताना चे रेकॉर्डिंग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे।हे संपूर्ण ध्वनी मुद्रण विनामूल्य  डाउनलोड करता येते. संस्थेच्या ह्या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थी तसेच शिक्षक व कालाकारानही ह्या ध्वनी मुद्रणाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत असलेला दिसून येत आहे. 

सर्व उपक्रमांचा हेतू अभिजात संगीताचा प्रसार  हा आहे. कुठल्याही आर्थिक नफ्या साठी वर्षी औंध संगीत महोत्सवाचे   ७५ वे वर्ष असून हा  अमृत महोत्सव दिमाखदारपणे साजरा व्हावा या साठी सर्व कार्यकर्ते  कार्यरत आहेत. उत्सवा साठी पिण्याच्या पाण्यापासून, जेवणाची सोय तसेच  आलेल्या कलाकार व रसिक श्रोते यांच्या राहण्याच्या, व येण्याजाण्याच्या व्यवस्थेची आखणी करण्याचे औंध सारख्या अतिशय छोट्या खेड्यातील व्यवस्थापनेच्या सर्व छोट्या मोठ्या कामात आपल्या सारख्या दानशूर लोकांचा पुरस्कर्ते म्हणून  सहभाग  असावा  ही  नम्र विनंती . 

आपल्या सारख्या मोठ्या मनाच्या देण्गीदारांशिवाय हा उत्सव चा पुढे नेण्याचे कार्य सोपे नहि. दरवषी वाढत जाणारा खर्च बघता त्याच्या तुटपुंज्या व्याजातून हा उत्सव चालविणे अत्यंत कठीण होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील कारखानदार, धनिक वर्ग, ह्यांनी जाहिराती, देणग्या  या द्वारे सहकार्य करावे व हा उत्सव अशाच प्रकारे पुढे चालू राहण्यासाठी संस्थेला  मदतीचा हात द्यावा ही विनंती.  

Bank Details: State Bank of India,
Aundh Branch A/c No. 31484704947
IFSCode: SBIN0002141

Shivanand Swami Sangeet Pratishthan is a Public Charitable Trust formed in the year 1981 and is registered under the Public Charitable Trust Act. Registration No A-760. Donations made to the Trust shall be eligible to the benefit of deduction u/s 80G 5) of the I.T Act 1961.

२०१५ हे साल औंध संगीत महोत्सवाचे अमृत महोत्सवी वर्ष असून हा उत्सव एका उंचीवर नेण्याचा मानस आहे.  या कार्यासाठी बऱ्याच  मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. आपण आमच्या कार्याची दखल घेऊन संस्थेस  आर्थिक पाठबळ दिल्यास परंपरेने चालत आलेला हा उत्सव अशाच प्रकारे जोमाने आणि नेटाने चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहिल. 

आपला  विश्वासू,
श्री मनोहर जोशी,
अध्यक्ष 
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान